शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रह्मगिरी पर्वत अवतरले टपाल पाकिटावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 01:27 IST

गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) समारोप करण्यात आला.

ठळक मुद्देअनावरण : ‘नापेक्स-२०१८’ तिकिटांच्या दोन दिवसीय जिल्हास्तरीय प्रदर्शनाचा समारोप

नाशिक : गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील ऐतिहासिक प्राचीन ‘ब्रह्मगिरी’ पर्वत टपालाच्या पाकिटावर अवतरले आहे. ‘नापेक्स-२०१८’ या टपाल तिकीट प्रदर्शनात या विशेष पाकिटाचे अनावरण करण्यात आले. दोन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी (दि.२१) समारोप करण्यात आला.नाशिक टपाल विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय प्रदर्शन शनिवारपासून महात्मा फुले कलादालनात सुरू होते. शनिवारी मुंबई क्षेत्राच्या जनरल पोस्टमास्तर शोभा मधाळे यांच्या हस्ते ‘ब्रह्मगिरी’ पर्वताचे छायाचित्र असलेल्या विशेष पाकिटाचे अनावरण सकाळच्या पहिल्या सत्रात करण्यात आले. ब्रह्मगिरी पर्वताचे महत्त्व लोकांपुढे यावे, या उद्देशाने टपाल विभागाने या प्रदर्शनाच्या निमित्ताने या विशेष पाकिटाचे लोकार्पण केल्याची माहिती मधाळे यांनी यावेळी दिली. त्यानंतर तिकीट संग्रहाची आवड जोपासण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी टपाल तिकिटे व त्यांचे महत्त्व त्यांच्यापुढे विषद करण्यात आले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे पारितोषिक मधाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रवर डाक अधीक्षक पी. जे. काखंडकी यांच्यासह परीक्षक प्रतिसाद नेऊरगावकर, उमेश काक्केरी हे उपस्थित होते. या टपाल तिकीट प्रदर्शनात जिल्ह्यातील विविध संग्रहकांनी सहभाग नोंदविला होता. सुमारे अकरा वर्षांनंतर नाशिक विभागाला अशा प्रकारच्या जिल्हास्तरीय प्रदर्शन आयोजित करण्याची संधी मिळाली होती. हे प्रदर्शन स्पर्धेच्या स्वरूपात भरविण्यात आले होते.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसStudentविद्यार्थी