बॉईज टाऊन, शरद पवार स्कूल अजिंक्य
By Admin | Updated: July 13, 2014 00:42 IST2014-07-12T23:03:50+5:302014-07-13T00:42:29+5:30
सुब्रतो मुखर्जी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धांचा समारोप

बॉईज टाऊन, शरद पवार स्कूल अजिंक्य
सुब्रतो मुखर्जी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धांचा समारोप
नाशिक : सुब्रतो मुखर्जी जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत १७ वर्षे वयोगटात शहर विभागात बॉईज टाऊन स्कूल तर ग्रामीण विभागात शरद पवार स्कूलने अजिंक्यपद पटकावले़
छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या मैदानावर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या स्पर्धांचा आज समारोप झाला़ १७ वर्षे वयोगटाचे उपांत्य व अंतिम फे रीचे सामने झाले़ अंतिम फे रीत मुलांच्या शहर विभागात बॉईज टाऊन स्कूलने सिम्बॉयसिस संघाचा ३-० ने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले़ मुलींमध्ये बॉईज टाऊन संघाने सेंट झेव्हीयर्स स्कूलचा ५-० असा पराभव करीत अजिंक्यपद मिळविले़ ग्रामीण गटात मुलांमध्ये शरद पवार स्कूलच्या संघाने बार्न्स स्कूलचा ३-० ने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले़ मुलींच्या गटात शरद पवार स्कूलच्याच संघाने सेंट पेड्रिक संघाचा ४-० ने पराभव करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली़
१४ वर्षे वयोगटातील शहरी व ग्रामीण मुलांचे अंतिम फे रीचे सामने झाले़ शहर विभागात अंतिम फे रीत अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात बॉईज टाऊन संघाने सेंट झेवियर्सवर १-० ने मात करीत अजिंक्यपदाला गवसणी घातली़ ग्रामीण विभागात बार्न्स स्कूलने डॉ़ सुभाष गुजर स्कूलचा ३-१ ने पराभव करत अजिंक्यपद पटकावले़
विजेत्या तसेच उपविजेत्या संघांना क्रीडाधिकारी संजय सबनीस व उपस्थितांच्या हस्ते बक्षीस तसेच प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले़ याप्रसंगी क्रीडाधिकारी रेखा परदेशी, अविनाश टिळे, महेश पाटील, मिलिंद वेरूळकर, प्रशिक्षक बी़ डी़ रॉय, क्रीडाशिक्षक पी़ डी़ मुसळे, बी़ डी़ पाटील आदि उपस्थित होते़