‘त्या’ दुर्दैवी बालकाचा मृतदेह सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 17:16 IST2017-07-28T17:16:09+5:302017-07-28T17:16:09+5:30

‘त्या’ दुर्दैवी बालकाचा मृतदेह सापडला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नवºयाच्या त्रासास कंटाळून जेलरोड येथील तीस वर्षीय परप्रांतीय महिलेने आपल्या दोन चिमुकल्यांसह नांदूर-पुलावरून गोदावरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी (दि़२२) दुपारच्या घडली होती़ स्थानिक नागरिकांनी अंजली रविशंकर चौरसिया (३०,रा़बालाजीनगर, जेलरोड, नाशिकरोड) व परिणिती रविशंकर चौरसिया (५) या दोघींना वाचविले मात्र दोन वर्षांचा कार्तिक रविशंकर चौरसिया हा चिमुरडा पाण्यात वाहून गेला होता़ त्याचा मृतदेह पाच दिवसानंतर बुधवारी (दि़२५) दारणासांगवी नदीपात्रात सापडला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़