शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

नव्या ट्रॅक्टरखाली सापडून एकुलता एक मुलगा ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 17:40 IST

आनंद ठरला क्षणभंगुर : पेढे वाटता वाटता घडली दुर्देवी घटना

ठळक मुद्देया घटनेने खरोले कुटुंबियांच्या आनंदावर क्षणार्धात विरजन पडून होत्याचे नव्हते झाले

सटाणा : नवीन घेतलेल्या ट्रॅक्टरवरून कुटुंबियांसह मोठ्या उत्साहाने शेतात जात असतांना गतीरोधकाचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर उधळून ट्रॅक्टरवर बसलेला आठ वर्षांचा एकुलता एक मुलगा चाकाखाली सापडून करु ण अंत झाल्याची ह्रदयद्रावक घटना तालुक्यातील लखमापूर येथे घडली.महालपाटणे (ता.देवळा) येथील रहिवाशी व व्हीपीएन संस्थेचे कर्मचारी विश्वनाथ खरोले यांनी सटाणा येथून शुक्रवारी (दि.२१) ट्रॅक्टर विकत घेतला. ट्रॅक्टर घेतल्याचा आनंद म्हणून खरोले हे आपल्या पत्नी व दोन्ही मुलांना ट्रॅक्टरवर बसवून आपल्या मूळ गावी महालपाटणे येथे जात असतांनाच लखमापूर येथे खरोले यांनी पेढे घेण्यासाठी आपल्या पत्नीला एका हॉटेलवर पाठवले. रहदारीला अडथळा नको म्हणून ट्रॅक्टर निंबोळा रस्त्याकडे उभे करण्यासाठी घेवून जात असतांनाच लखमापूर-निंबोळा चौफुलीवरील गतिरोधकावर ट्रॅक्टर उधळल्याने खरोले यांचा मुलगा आयुष तोल गेल्याने तो ट्रॅक्टरवरून खाली पडला. काही समजण्याच्या आत आयुषवर ट्रॅक्टरचे मोठे चाक चालून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खरोले कुटुंबियांच्या आनंदावर क्षणार्धात विरजन पडून होत्याचे नव्हते झाले. मोठ्या उत्साहाने नवीन ट्रॅक्टरचे पेढे घेवून आलेल्या आयुषच्या आईला आपल्या मुलाचा मृतदेह पाहण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे पाहून आणि आपला एकुलता एक मुलगा आपल्याच ट्रॅक्टरखाली पडून मृत्यू झाल्याने आई - वडील आणि आयुषच्या बहिणीने हंबरडा फोडला. ही दुदैवी घटना तेथे उपस्थित सर्वांनाच चटका लावून गेली. आयुष हा सटाणा येथील मनीबाई अग्रवाल प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीत शिकत होता.

टॅग्स :NashikनाशिकAccidentअपघात