शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दारूचा शौक भागविण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाने पित्याला दिला चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 17:49 IST

माणसामाणसांमधील संवदेना तर हरवूनच बसल्या आहेत मात्र नातेसंबंधातील ऋुणानुबंध आणि संवदेना संपुष्टात येत असल्याचे विविध घटनांवरून अनेकदा स्पष्ट होते.

ठळक मुद्देमातृपितृ देवो भव: ही संस्कृतीही तो विसरला जन्मदात्री मातेलाही शिव्यांची लाखोली

नाशिक : मातृपितृ देवो भव: अशी संस्कृती जोपासणाऱ्या राज्याच्या भूमीत दारुचा शौक भागविण्यासाठी पित्याने पैसे दिले नाही म्हणून त्या जन्मदात्या बापाला पोटचा गोळा म्हणविणाऱ्या मुलाने चक्क चोप दिल्याची घटना घडली आहे. याबाबत पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मुलाविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.कलियुगात कधी काय घटना घडेल, याचा अंदाज बांधणे अवघड आहे. माणसामाणसांमधील संवदेना तर हरवूनच बसल्या आहेत मात्र नातेसंबंधातील ऋुणानुबंध आणि संवदेना संपुष्टात येत असल्याचे विविध घटनांवरून अनेकदा स्पष्ट होते. असाच काहीसा केविलवाणा व तितकाच लाजिरवाणा प्रकार शहरातील रविवार पेठेतील शनी गल्लीमध्ये घडला.या भागातील रहिवासी रमेश नुनासे (६३) यांचा मुलगा शेखर याने दारू पिण्यासाठी त्यांच्याकडे पैशांचा तगादा लावला त्यांनी नकार दिला असता शेखरने चक्क जन्माला घालणाºया आपल्या पित्याला ‘मी तुम्हाला पाहून घेतो’ अशी धमकी देत लाकडी दंडुक्याने मारहाण केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.दारू प्यायची म्हणून आई-वडिलांकडून पैशांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही म्हणून या बेभान मुलाने समोर उभ्या असलेल्या पित्याला मारहाण केली यावरच तो थांबला नाही तर मातृपितृ देवो भव: ही संस्कृतीही तो विसरला आणि जन्मदात्री मातेलाही शिव्यांची लाखोली वाहिली, ही घटना तीतकीच संतापजनक आहे. त्यामुळे समाजाची वाटचाल नेमक्या कुठल्या दिशेने होत आहे, याचाच प्रत्यय या घटनेतून यावा.

 

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी