ओझरटाऊनशिप येथून मुलगा बेपत्ता
By Admin | Updated: November 23, 2015 23:33 IST2015-11-23T23:33:12+5:302015-11-23T23:33:40+5:30
ओझरटाऊनशिप येथून मुलगा बेपत्ता

ओझरटाऊनशिप येथून मुलगा बेपत्ता
ओझरटाऊनशिप : येथून जवळच असलेल्या दात्याने शिवारात राहणारा अकरा वर्षाचा मतिमंद मुलगा पंधरा दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. त्यास पळवून नेले असल्याचा संशय त्याच्या पित्याने ओझर पोलीस ठाण्याला दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला आहे.
दात्याने शिवारातील महादेव
नगर येथे राहणारा विजय ऊर्फ पांग्या सुरेश वाघ (११) हा मुलगा
मतिमंद असून, पंधरा दिवसांपूर्वी खेळण्यासाठी तो ओणे शिवारात गेला असता, तेथून तो परत आला नाही. त्याचा सर्वत्र शोध घेतला. परंतु अद्याप मिळून आला नाही. पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय मतिमंद असून, त्याची उंची साडेचार फूट, शरीराने मध्यम, चेहरा गोल, रंगाने सावळा, अंगात तपकिरी शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅँट आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आय. बी. मोरे करीत आहेत. (वार्ताहर)