शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५% कर लादला, १ ऑगस्टपासून लागू होणार; दंडही ठोठावला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
4
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
5
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
6
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
7
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
8
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
9
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
10
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
11
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
12
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
13
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
14
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
15
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
16
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
17
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
18
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
19
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
20
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!

पाणी तलावात टाकण्यात अडसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:17 IST

हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.

वीरगाव : हरणबारी उजव्या कालव्याचे पाणी ढोलबारे (ता. बागलाण) येथील पाझर तलावात टाकण्याच्या कामाला गत चार वर्षांपूर्वी शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या तलावासाठी धरणातून पाण्याचे आरक्षणही मंजूर करण्यात आले आहे. या कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हरणबारी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गाकडून प्रांतवादाच्या मुद्द्यावर या कामास विरोध होण्याची शक्यता गृहीत धरून लोकप्रतिनिधीही राजकीय अडसर ठरणाºया या मुद्द्यालाच बगल देण्याचे काम करत असल्याने ढोलबारे धरण पाणीप्रश्न दिवसेंदिवस लांबताना दिसून येतो आहे.  आरम व मोसम या दोन्हीही प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या व अवर्षणग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाºया वीरगाव परिसरातील आठ ते दहा गावांतील शेती सिंचनासाठी कोणत्याही प्रभावी उपाययोजना शासन स्तरावरून नसल्याने येथील शेतीला वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्यावरच विसंबून राहावे लागत आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी गत दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत येथील शेतकरीवर्गाने एकत्र येत पाणी अडवा, पाणी जिरवा यासारखी अनेक कामे लोकसहभागाच्या जोरावर पूर्ण करून शेती सिंचनावर मात करण्यात काही अंशी यश मिळविले आहे. लोकसहभागाच्या जोरावर अनेक नाल्यांवर बांध घालून जमिनीत पाणी जिरविण्याचे काम शेतकरी वर्ग करीत असताना या नाल्यांना कायमस्वरूपी पाण्याचा प्रवाह उपलब्ध होणे ही काळाची गरज असून, हरणबारीच्या पाण्यातूनच हे साध्य होणार आहे.वीरगाव या गावापासून चार किमी अंतरावर ढोलबारे पाझर तलाव आहे. तलावाची साठवण क्षमता सुमारे १५ दलघफू एवढी आहे. या तलावाच्या उत्तरेस अवघ्या १.५ किमी अंतरावर हरणबारी धरणाचा उजवा कालवा वाहतो. या कालव्याद्वारे दरवर्षी हजारो क्यूसेस पूरपाणी वाहून जात असते. या पूरपाण्यातून लाभक्षेत्रातील बंधारे भरून अनेक नाल्यांमध्ये हे पाणी सोडले जात असल्याने कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीला सोन्याचे दिवस आले आहेत.  एकीकडे ही परिस्थिती असताना अवघ्या दोन ते तीन किमी अंतरावरील वीरगाव परिसरातील शेतीला मात्र लहरी पावसाच्या पाण्यावरच वर्षानुवर्ष अवलंबून राहावे लागत आहे. याचमुळे हरणबारी धरणाचे पूरपाणी तसेच आरक्षित पाण्याचा फायदा वीरगाव परिसरातील शेतीसाठीही व्हावा यासाठी येथील शेतकरीवर्ग गत सात ते आठ वर्षांपासून याप्रश्नी आवाज उठविताना दिसून येत आहे.  या कामातील अनेक तांत्रिक त्रुटी दूर सारत कामास प्रशासकीय मान्यता मिळवून देण्यात दिवंगत आमदार ए. टी. पवार यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. ११६० दलघफू क्षमता असलेल्या हरणबारी धरणातील पाण्याचा प्रत्येक थेंब अन् थेंब शेती व पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्यात आला आहे.  गत आठ ते दहा वर्षांपासून मोसम नदीवर बंधारे बांधण्यासाठी शेतकरी वर्गाकडून आग्रही मागणी झाल्यानंतर या बंधाºयांसाठी साल्हेर वळण योजना १ व २ अंतर्गत पाण्याची उपलब्धता करण्यात आली आहे. याच उपलब्ध पाण्यातून ढोलबारे येथील पाझर तलावासाठीही पाणी आरक्षित करण्यात आले आहे.  कालवा खोदकाम मार्गातील शेतकरी वर्गाच्या हरकती दूर करण्यातही या भागातील जनतेला यश आले आहे; मात्र यानंतरही या कामास निधी उपलब्ध होत नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी