पाचशेच्या नोटेखाली वहीचे कागद!

By Admin | Updated: September 29, 2016 01:10 IST2016-09-29T01:10:17+5:302016-09-29T01:10:53+5:30

बडोदा बँके तील प्रकार : आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक

Bottle of paper below five hundred! | पाचशेच्या नोटेखाली वहीचे कागद!

पाचशेच्या नोटेखाली वहीचे कागद!

नाशिक : बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेल्या इसमास दोघा भामट्यांनी जादा रकमेचे आमिष दाखवून दीड लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळच्या सुमारास शालिमार येथील बँक आॅफ बडोदा शाखेमध्ये घडला़
भद्रकाली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चिंतामण शंकर पवार (४०, रा़ नवनाथनगर, प्रर्निंग टॅपिंग कंपनीजवळ, अंबडगाव, नाशिक) हे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बडोदा बँकेच्या शाखेत ५२ हजार रुपये भरण्यासाठी आले होते़ त्यावेळी बँकेत असलेल्या दोघा भामट्यांनी त्यांना ५२ हजार रुपयांच्या बदल्यात आपल्याकडील दीड लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले़ या भामट्यांच्या आमिषास बळी पडलेल्या पवार यांना त्यांनी रुमालात बांधलेल्या नोटांचे पुडके दिले व तेथून फरार झाले़
दोन्ही भामटे बँकेतून निघून गेल्यानंतर पवार यांनी रुमाल उघडून बघितला असता नोटांच्या बंडलवरील पहिली पाचशे रुपयांची नोट खरी तर त्याखाली नोटाच्या आकाराचे वहीचे कागद ठेवलेले होते़
बँकेत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार त्यांनी भद्रकाली पोलीस ठाणे गाठले़ याप्रकरणी पोलिसांनी दोघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Bottle of paper below five hundred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.