दोन्ही प्रभागांत तिरंगी लढत

By Admin | Updated: June 14, 2014 01:59 IST2014-06-14T01:34:02+5:302014-06-14T01:59:32+5:30

प्रभाग क्रमांक १७ मधील महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही प्रभागांत तिरंगी लढत

In both the wards the tricolor struggled | दोन्ही प्रभागांत तिरंगी लढत

दोन्ही प्रभागांत तिरंगी लढत

सातपूर : येथील प्रभाग क्रमांक १७ मधील महापालिका पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने तिन्ही उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी दोघा माजी नगरसेवकांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रभाग १७ च्या पोटनिवडणुकीत माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी महायुतीकडून, तर माजी नगरसेवक सदाशिव माळी यांनी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय अपक्ष म्हणून सुनील शेंडे यांनीही अर्ज दाखल केला आहे. तत्पूर्वी धोलप्पा धोने यांनीही अर्ज दाखल केला केला होता; परंतु छाननीत त्यांचा अर्ज अवैध ठरला. साहेबराव जाधव यांनी माघार घेतल्याने तिघे उमेदवार निवडणूक रिंगणात असले, तरी महायुतीचे पाटील आणि आघाडीचे माळी यांच्यातच सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. (वार्ताहर)

Web Title: In both the wards the tricolor struggled