पुरात अडकलेल्या दोघांची सुटका
By Admin | Updated: July 11, 2016 00:03 IST2016-07-10T23:58:40+5:302016-07-11T00:03:08+5:30
पुरात अडकलेल्या दोघांची सुटका

पुरात अडकलेल्या दोघांची सुटका
नाशिक : शहरात शनिवारपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे शहराजवळील नदी-नाल्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात गोदावरीत येत होते़ दुपारच्या सुमारास पावसाचा जोर आणखीच वाढला होता़ यादरम्यान रामकुंडाजवळील गांधीज्योतजवळ निवृत्ती गणपत बिन्नर (५५, रा़ ठाणगाव, ता़ सिन्नर, जि़ नाशिक) व विठ्ठल संभाजी कारवतकर (६०, रा़ अमरावती) हे दोघे फिरस्ते जाऊन बसले होते़ अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे या दोघांना बाहेर पडणे मुश्कील झाले. (प्रतिनिधी)अग्निशामक दलाच्या जवानांचे प्रयत्न४गोदावरीच्या पाण्याच्या पातळीत सारखी वाढ होत असल्यामुळे या दोघांच्या जिवाची घालमेल वाढली होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलास मिळाल्यानंतर या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या दोघांचीही या ठिकाणाहून सुखरूप सुटका केली़