दिव्याचा पाडा येथे वृद्धाच्या खून प्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: September 11, 2014 00:16 IST2014-09-10T22:23:19+5:302014-09-11T00:16:59+5:30
दिव्याचा पाडा येथे वृद्धाच्या खून प्रकरणी दोघांना अटक

दिव्याचा पाडा येथे वृद्धाच्या खून प्रकरणी दोघांना अटक
हरसूल : पूर्ववैमनस्यातून दिव्याचा पाडा, ता. त्र्यंबकेश्वर येथे देवराम काशीराम दिवे (६२) यांचा पाण्यात बुडवून खून केल्याची फिर्याद काळू काशीराम दिवे यांनी हरसूल पोलिसांत दिली आहे.
हरसूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचा भाऊ काळू दिवे याने दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, देवराम दिवे हे माळेगाव येथून दिव्याचा पाडा येथे घरी येत असताना मनोहर दिवे यांच्या शेताजवळील नाल्यात पाण्यात बुडवून त्यांना जिवे ठार मारण्यात आले, अशी माहिती सपोनि रावसाहेब कीर्तीकर यांनी दिली आहे.
हरसूल पोलिसांनी याप्रकरणी खंडू महादू दिवे, निवृत्ती पांडुरंग दिवे (रा. दिव्याचा पाडा) या दोघांना अटक करून नाशिक न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवस पोलीस कोठडी देण्यात आली. सपोनि रावसाहेब कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नरेंद्र खैरनार, एएसआय अंबादास जाडर, हवालदार मनोहर चव्हाण, पोलीस नाईक मुरलीधर कामडी यांनी आरोपींना अटक करण्यासाठी व न्यायालयात हजर करण्यासाठी परिश्रम घेतले.
पुढील तपास पेठ उपविभागीय पोलीस अधिकारी मोक्षदा पाटील या करीत आहेत.(वार्ताहर)