नाशिकरोडला गोदावरीत दोघे बुडाले

By Admin | Updated: August 11, 2014 00:51 IST2014-08-10T22:58:36+5:302014-08-11T00:51:26+5:30

नाशिकरोडला गोदावरीत दोघे बुडाले

Both of them died in Nashik Road | नाशिकरोडला गोदावरीत दोघे बुडाले

नाशिकरोडला गोदावरीत दोघे बुडाले

 

नाशिकरोड : जेलरोड टाकळीरोड येथील आढाव मळ्याजवळ सायंकाळी गोदावरी नदीकिनारी फिरण्यास गेलेल्या विद्यार्थ्यासह वसतिगृहाचा व्यवस्थापक असे दोघेजण नदीपात्रात वाहून गेल्याची घटना सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली़
येथील गुड शेफ र्ड होम वसतीगृहातील विद्यार्थी आकाश अशोक गायकवाड (१५), मूळ रा़ भांडूप, मुंबई व वसतिगृहाचे व्यवस्थापक मुकेश अंबादास हिवराळे (३१), मूळ रा़ अमरावती यांचा यामध्ये समावेश आहे़ याबाबत पोलीस व प्रत्यक्षदर्शींकडून समजलेल्या माहितीनुसार या वसतिगृहातील मुले व व्यवस्थापक हे दर रविवारी सायंकाळी जवळील गोदावरी नदीकिनारी फि रण्यासाठी जात असत़ आज सायंकाळी नेहमीप्रमाणे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास मुकेश हिवराळे हे वसतिगृहातील १५ मुलांसमवेत टाकळीरोड आढाव मळ्याजवळील नदीकिनारी गेले होते़ तेथे नवीन पुलाचे काम चालू असलेल्या ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे़ ते फि रत असताना आकाश गायकवाडचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडून गटांगळ्या खाऊ लागला़ यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या आरडाओरडीमुळे हिवराळे यांनी पाण्यात उडी घेतली़ परंतु पाण्याला खोली व तीव्र प्रवाह असल्याने ते दोघेही पाण्यात वाहून गेले़ उर्वरित विद्यार्थ्यांनी आरडाओरड करत बाजूच्या नागरिकांना सदर घटना सांगितल्यावर नागरिकांनी उपनगर पोलीस तसेच अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती दिली़ त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांचा शोध सुरू केला; मात्र उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता़

Web Title: Both of them died in Nashik Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.