घोटी गटातून दोघांचे अर्ज

By Admin | Updated: February 4, 2017 01:02 IST2017-02-04T01:02:00+5:302017-02-04T01:02:16+5:30

घोटी गटातून दोघांचे अर्ज

Both of them are from the Ghoti group | घोटी गटातून दोघांचे अर्ज

घोटी गटातून दोघांचे अर्ज

घोटी : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी घोटी गटातून दोघांनी तर गणातून एका जणांनी तसेच मुंढेगाव गणातून मनसेकडून दोघा महिलांनी शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले.
दोन दिवस कोरडे गेल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवाराचा उत्साह दिसून आला. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घोटी गटातून संदीप पंडितराव किर्वे यांचा उमेदवारी अर्ज आपल्या समर्थकांसह दाखल केला तर घोटी गणातून रवि दिनकर रूपवते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर मुंढेगाव गणातून मनसेकडून चुल्हाबाई गतीर व रंजना तोकडे यांनी आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, आज तिसऱ्या दिवशी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाल्याने आवाराला यात्रेचे रूप आले होते.

Web Title: Both of them are from the Ghoti group