दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

By Admin | Updated: September 16, 2014 00:22 IST2014-09-15T20:59:00+5:302014-09-16T00:22:52+5:30

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

Both of the robbers are arrested | दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

 

सटाणा : शहरालगतच असलेल्या यशवंतनगर येथील स्टेट बँकेची शाखा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दरोडेखोरांना सटाणा पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून
दोघांना अटक करण्यात यश मिळविले. मात्र चार दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी ठरले. हा प्रकार रविवारी मध्यरात्री २ वाजता
घडला.
पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल शीतल गायकवाड व पोलीस वाहनचालक बापू नेरकर हे रात्री गस्तीला यशवंतनगर परिसरात आले असता त्यांना भारतीय स्टेट बँकेजवळ अंधारात काही इसम संशयास्पदरीत्या आढळून आले. चौधरी यांनी त्यांना हटकले असता अंधाराचा फायदा घेत त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
कैलास चौधरी यांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग केला आणि अक्षय संपत जाधव (रा.मावडी, ता. दिंडोरी) सुनील रमेश सुराशे (रा. हिवरखेड, ता. सिन्नर) यांना पकडले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे चाकू, पोगर आणि मिरची पूड मिळून आली. फरार झालेल्या इतर चौघांचा शोध घेण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी विनायक ढाकणे व पोलीस निरीक्षक भागवत जायभाये व कर्मचाऱ्यांनी परिसर पिंजून काढत मुख्य मार्गांवर
नाकाबंदी केली मात्र त्यांना यश आले नाही.
दोन्ही आरोपींची पोलिसांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी दरोड्यासाठीच परिसरात आल्याची कबुली दिली असून, पोलिसांच्या तत्परतेने मोठी विपरीत घटना
टळल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. इतर चार आरोपींना लवकरच अटक करून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. (वार्ताहर)
’ नाशिक : जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे़ विशाल शिवाजी कामडी (३२, गुलमोहोर कॉलनी, सातपूर) यांनी आपली हीरोहोंडा दुचाकी जिल्हा परिषदेच्या पार्किंगमध्ये लावलेली होती़

पंचवीस हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली़

Web Title: Both of the robbers are arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.