अपघातात दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2020 10:15 PM2020-09-13T22:15:39+5:302020-09-14T00:31:38+5:30

नाशिकरोड : विहीतगावजवळ दुचाकीने जाणाऱ्या एक सेवानिवृत्त शिक्षकास ओव्हरटेक करणाºया दुसºया भरधाव दुचाकीचालकाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी होऊन मयत झाले.

Both killed in the accident | अपघातात दोघे ठार

अपघातात दोघे ठार

Next
ठळक मुद्देमाजी शिक्षकाचा मृत्यू : देवळाली कॅम्प लॅमरोडवर दुर्घटना

नाशिकरोड : विहीतगावजवळ दुचाकीने जाणाऱ्या एक सेवानिवृत्त शिक्षकास ओव्हरटेक करणाºया दुसºया भरधाव दुचाकीचालकाने धडक दिल्याने शिक्षक गंभीर जखमी होऊन मयत झाले.
देवळाली रेस्ट कॅम्प रोड, बनात चाळ, रेणुका संकल्प इमारतीत राहणारे अभिषेक रमेश नगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्र वारी (दि.११)दुपारी देवळाली छावणी हायस्कूलचे माजी शिक्षक रमेश मलाना रिक्कल हे दुचाकीने (एम एच १५ जी जी १८३६) शुक्र वारी दुपारी तीन वाजता विहीतगावकडून देवळाली कॅम्पकडे जात होते. यावेळी त्यांच्यापाठीमागून आलेल्या दुचाकी चालकाने (एम एच १५ जी एस ८६०४) रमेश रिक्कल यांना ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत ते खाली कोसळून जखमी झाले. रु ग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे सायंकाळी निधन झाले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसºया दुर्घटनेत रेणुका गार्डन इमारतीसमोर दुचाकीवरील युवकाने पिकआप जीपला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तो मयत झाला.
देवळाली कॅम्प हाडोळा येथील युवक सनी रामदास ठोकळ (२८) हा गेल्या सोमवारी (दि.७)सायंकाळी सहाच्या सुमारास देवळाली कॅम्पकडून विहीतगावच्या दिशेने मोटरसायकलने (एम एच १५ जी एन ५१८३) भरधाव वेगाने जात होता. रेणुका गार्डन इमारतीसमोर त्याच्यापुढे चालत असलेल्या असलेल्या पिकअप जीप चालकाने अचानक ब्रेक मारल्याने सनीचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो पाठीमागून जीपवर जाऊन आदळला. त्याच्या तोंडाला, डोके व छातीला जबर मार लागला. यामध्ये तो गंभीर जखमी होऊन मयत झाला. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Both killed in the accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.