नाशिकच्या दोघांना सुवर्णपदक

By Admin | Updated: May 18, 2016 00:06 IST2016-05-17T23:57:37+5:302016-05-18T00:06:59+5:30

नाशिकच्या दोघांना सुवर्णपदक

Both the gold medals of Nashik | नाशिकच्या दोघांना सुवर्णपदक

नाशिकच्या दोघांना सुवर्णपदक


नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा १५वा पदवीदान सोहळा वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी विविध विद्याशाखेमधील ७३ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. त्यामध्ये नाशिकच्या दोघा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात तावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सुवर्णपदके आणि प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या इंट्रापॅथी अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी प्राजक्ता वासुदेव दीक्षित, तर चांदवडच्या के.बी. आबड महाविद्यालयाची विद्यार्थिनी शालिनी शर्मा हिने सुवर्णपदक प्राप्त केले.

Web Title: Both the gold medals of Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.