दोघे ताब्यात : पोलीस, सुरक्षा रक्षकांची सावधानता

By Admin | Updated: November 13, 2014 23:54 IST2014-11-13T23:52:49+5:302014-11-13T23:54:32+5:30

व्यापाऱ्याचे लाखो रुपये चोरण्याचा प्रयत्न फसला

In both custody: Police, security guard warns | दोघे ताब्यात : पोलीस, सुरक्षा रक्षकांची सावधानता

दोघे ताब्यात : पोलीस, सुरक्षा रक्षकांची सावधानता

नांदगाव : आज आठवडे बाजाराच्या गर्दीची संधी साधून बँकेतून काढलेली १५ लक्ष रु. ची रोख रक्कम पळविण्याचा प्रयत्न गस्त पोलीस व बँकेचा सुरक्षारक्षक यांच्या प्रसंगावधानामुळे फसला. रककम पळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोघा अल्पवयीनांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यात एक मुलगी आहे व त्यांची वय वर्षे अवघी नऊ व दहा अशी आहेत.
याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र चोरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून कालूगा सिसोदिया (वय ९) व जानकी सिसोदिया (वय १०) या दोघा बहिण भावास पोलीसांनी ताब्यात घेतले असून बालसुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात येत आहे. ते मध्यप्रदेशातील रायगड जिल्ह्यातील नरसिंहगड तालुक्यातल्या ग्रामीण भागातले रहिवासी असल्याचे सांगतात. ते हिंदी बोल बोलतात. तसेच ‘हमारी मम्मी गुम हो गई है’ असा बनाव पोलीसांकडे करत आहेत.
येथील एक व्यापारी स्टेट बँकेत रक्कम काढायला गेले असता कालूगा व जानकी दोघांना तिथे घुटमळतांना बघून सुरक्षा रक्षक निवृत्ती शिंदे यास संशय आला. दरम्यान रक्कम
घेऊन स्कूटरवरुन निघालेल्या व्यापाऱ्याच्या मागे अंतर ठेवून वेगाने निघालेल्या मुलांची हालचाल बँकेजवळ गुप्तपणे गस्त घालणाऱ्या चाणाक्ष नजरेच्या प्रणय इंगळे (पोलीस) यांच्या डोळ्यातून सुटली नाही.
स्कूटरकडे झेपावणाऱ्या मुलास हटकण्यासाठी ते पुढे सरसावले. दरम्यान शिंदे यांना त्यांनी मुलीला पकडण्यास सांगीतले. आता आपण पकडले जाणार म्हणून मुलाने बाजाराच्या दिशेने पळ काढला. पण इंगळे यांनी पाठलाग करुन त्याला ही पकडले. त्यानंतर दोघांची रवानगी पोलीस स्टेशनमध्ये झाली. पुढील तपास पोलीस निरिक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
सुमारे दीड वर्षे आधी अशाच अल्पवयीन मुलांना बँकेजवळ चोरीच्या प्रयत्नात असतांना पकडण्यात आले होते. ते देखील मध्यप्रदेशकडून आले होते.(वार्ताहर)

Web Title: In both custody: Police, security guard warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.