विनयभंग प्रकरणी दोघांना अटक
By Admin | Updated: August 18, 2016 01:48 IST2016-08-18T01:48:12+5:302016-08-18T01:48:47+5:30
विनयभंग प्रकरणी दोघांना अटक

विनयभंग प्रकरणी दोघांना अटक
त्र्यंबकेश्वर : येथील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा घराकडे पायी जाताना बंटी ऊर्फ पुंडलीक मोतीराम चव्हाण (बेझे) व धनंजय अमृता चव्हाण यांनी विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
दि. ८ आॅगस्ट रोजी महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनी घराकडे जात असताना पुंडलीक चव्हाण व धनंजय चव्हाण यांनी तिला रस्त्यात गाठून विनयभंग केला.
तिने आरडाओरडा केल्यानंतर दोघे युवक पळून गेले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी त्र्यंबक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. मात्र पोलिसांनी फक्त कच्ची नोंद करून आरोपीस सोडून दिले. त्याच रात्री बंटी ऊर्फ पुंडलीक मोतीराम चव्हाण (बेझे) व धनंजय अमृता चव्हाण यांनी मुलीच्या घरी जाऊन त्यांना धमकी दिली. त्यामुळे घाबरून मुलीच्या वडिलांनी पुन्हा फिर्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी त्वरित कारवाई करण्याचे आदेश दिले.
संशयित आरोपी बंटी ऊर्फ पुंडलीक व धनंजय चव्हाण यांना बेझे येथून अटक करण्यात आली. दरम्यान, बंटी हा पूर्वी अंबड (नाशिक) येथे राहात होता. तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे बोलले जाते. याशिवाय झालेल्या प्रकाराची बेझेवासीयांनी दखल घेऊन दि. १५ आॅगस्टच्या ग्रामसभेत एकमुखाने युवकाच्या वागणुकीविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)