कट्टे, काडतुसासह दोघांना अटक
By Admin | Updated: October 23, 2015 22:03 IST2015-10-23T21:59:03+5:302015-10-23T22:03:29+5:30
कट्टे, काडतुसासह दोघांना अटक

कट्टे, काडतुसासह दोघांना अटक
नाशिकरोड : क्राईम ब्रॅँच युनिट-३ ने दोघा संशयितांकडून दोन गावठी कट्टे व सहा जिवंत काडतूस जप्त केले आहेत. कट्टे विकणारा मुख्य सूत्रधार फरारी आहे.
क्राईम ब्रॅँच युनिट-३चे पोलीस निरीक्षक संजय सानप, पोलीस नाईक विलास गांगुर्डे यांना सिन्नर फाटा एकलहरारोड येथे एका युवकाकडे गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने पाच दिवसांपूर्वी एकलहरारोड संभाजी हॉटेल परिसरात सापळा रचून दत्तात्रय सुरेश डहाळे (रा. श्रीरामनगर, शिर्डी) यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ४० हजार रुपये किमतीचा देशी बनावटीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस मिळून आले होते. पोलिसांनी संशयित डहाळे याची कसून चौकशी केली असता त्याचा सहकारी भाऊसाहेब सुदाम आहिरे (रा. खरवंदी, येवला) यास ताब्यात घेतले असता चौकशीअंती दोघांकडून एकूण २ कट्टे व ६ जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. संशयितांना गावठी कट्टे विकणारा भूषण महेंद्र मोरे (रा. श्रीरामनगर, शिर्डी) हा फरार झाला आहे.