बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2016 01:38 IST2016-03-30T01:12:38+5:302016-03-30T01:38:32+5:30
बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक

बलात्कार करणाऱ्या दोघांना अटक
सिन्नर : तालुक्यातील गोंदे येथील ३० वर्षीय विवाहितेला दमबाजी करून वेळोवेळी बलात्कार करणाऱ्या दोघांना वावी पोलिसांनी अटक केली आहे. सदर दोन्ही संशयित महिलेचे नातेवाईक आहेत.
गोंदे येथील पीडित महिलेवर संशयित आरोपी तीन महिन्यांपासून पोल्ट्री शेडमध्ये व शेतात वेळोवेळी अत्याचार करीत असल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही आरोपींनी संगनमताने महिला एकटी असल्याचे पाहून तिच्या राहत्या घरात व शेतातील नाल्यामध्ये तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. ‘तू कोणाला सांगितले तर तुझ्या नवऱ्याला मारून टाकू’, असा दम दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीहून पोलिसांनी संशयित सुरेश जायभावे (३७) व गणेश सांगळे (२५) या दोघांना अटक केली आहे.(वार्ताहर)