अंगणगावचा बोटिंग क्लब चकाचक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 23:16 IST2017-10-02T23:16:04+5:302017-10-02T23:16:43+5:30
येवला : संतोष जनसेवा मित्रमंडळाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त सोमवारी अंगणगाव येथील बोटिंग क्लब परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या परिसरात पंधरा दिवसांपूर्वी तणनाशक फवारणी केल्यानंतर सोमवारी सुमारे तीन ट्रॅक्टरभर कचरा, गवत, काटेरी झुडपे व इतर घाण काढण्यात आली. यामुळे बोटिंग क्लब परिसर चकाचक होऊन त्याला पुनर्वैभव मिळाले आहे.

शहरालगतच्या अंगणगाव येथील सुंदर तळ्याला सुशोभित करून फिरण्यासाठी ट्रॅक करण्यात आला आहे. शहरातील नागरिक सकाळ-संध्याकाळ फिरायला जातात. मात्र बोटिंग क्लब परिसरात तलावाभोवताली मोठ-मोठ्या बाभळींचे साम्राज्य होऊन गवताने घेरले आहे. बोटिंग क्लबच्या परिसरात सुमारे ८०० मीटरचा पायी चालण्यासाठी जॉगिंग ट्रॅक उभारण्यात आला असून, या ट्रॅकच्या कडेला पावसामुळे प्रचंड प्रमाणात काटेरी झुडपे, काट्या, गवत वाढल्याने फिरायला जाणाºया-येणाºया नागरिकांना अडथळा येत असून, बोटिंग क्लबचे देखणेपणही यामुळे हरवले आहे.
यामुळे पंधरा दिवसांपूर्वी संपूर्ण परिसरात स्वखर्चाने राउंडअप या तणनाशकाची फवारणी केल्यानंतर संतोष जनसेवा मित्रमंडळाचे अध्यक्ष कुणाल दराडे यांच्या पुढाकारातून विशेष स्वच्छता मोहीम राबवली. सुमारे सत्तर स्वयंसेवकांच्या सोबत दराडे यांनी सकाळी ८ वाजता येथील स्वच्छता मोहीम हाती घेतली.
संपूर्ण ट्रॅकवर उगवलेले गवत, काटेरी झाडे-झुडपे काढण्यात येऊन सुमारे दोन ट्रॅक्टर भरेल इतका कचरा इतरत्र नेऊन त्याची विल्हेवाट लावण्यात आली. विशेष म्हणजे, इतकाच कचरा जागेवरच जमा करून जाळण्यात आला. झाडाझुडपांची कटिंगदेखील करण्यात येऊन त्याला सौंदर्य मिळवून देण्यात आले.
झाडाझुडपात आढळल्या मद्याच्या बाटल्या
च्या ठिकाणी नागरिक फिरण्याच्या नावाखाली येऊन सायंकाळी मद्य सेवन करण्यासाठीदेखील येऊन बसत असल्याने या झाडाझुडपातून मद्याच्या बाटल्यादेखील स्वयंसेवकांनी जमा केल्या. सुमारे दोन ते अडीच तास ही मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण बोटिंग क्लब व त्यावरील ट्रॅक चकाचक दिसून येत होता.