विनयभंग प्रकरणी बोरसे यांना अटक
By Admin | Updated: December 10, 2015 22:49 IST2015-12-10T22:14:32+5:302015-12-10T22:49:20+5:30
विनयभंग प्रकरणी बोरसे यांना अटक

विनयभंग प्रकरणी बोरसे यांना अटक
सटाणा : केळझर कृती समितीचे सचिव कैलास श्रावण बोरसे यांच्याविरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात बोरसे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्याने सटाणा पोलिसांनी सत्र न्यायालयातच बोरसे यांना अटक केली आहे.
सटाणा पोलीस ठाण्यात ११ आॅक्टोबर २०१५ रोजी कैलास बोरसे यांच्या विरोधात एका महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात अटक होण्याच्या आतच बोरसे यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर करून घेतला होता. मात्र मालेगावच्या सत्र न्यायालयाने बोरसेंचा अंतरिम जामीन फेटाळल्याने सटाणा पोलिसांनी त्यांना न्यायालयातच अटक केली. याबाबतची माहिती सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पी. टी. पाटील यांनी दिली आहे. (वार्ताहर)