सावकी सोसायटीच्या चेअरमनपदी बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:41 IST2020-12-11T04:41:49+5:302020-12-11T04:41:49+5:30

चेअरमन निवडीसाठी मंगळवारी (दि.८) देवळा तालुक्याचे सहायक निवडणूक अधिकारी डी. एन. देशमुख यांनी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. चेअरमनपदासाठी ...

Borse as Chairman of the Savki Society | सावकी सोसायटीच्या चेअरमनपदी बोरसे

सावकी सोसायटीच्या चेअरमनपदी बोरसे

चेअरमन निवडीसाठी मंगळवारी (दि.८) देवळा तालुक्याचे सहायक निवडणूक अधिकारी डी. एन. देशमुख यांनी संचालक मंडळाची बैठक बोलावली होती. चेअरमनपदासाठी अंबादास राजाराम बोरसे यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवड जाहीर होताच कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून सचिव गंगाधर पवार यांनी काम पाहिले.

यावेळी संचालक दिलीप देवरे, जयप्रकाश शिवले, दिलीप शिवले, वत्सलाबाई पाटील, मेहमूद पटेल, विक्रम सोनवणे, बारकू अहिरे, पुष्पाबाई दुबे, सुशीलाबाई निकम, बापू बोरसे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. नवनिर्वाचित चेअरमन बोरसे यांनी संचालक मंडळ, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थांचे आभार मानले.

Attachments area

===Photopath===

091220\09nsk_7_09122020_13.jpg

===Caption===

सावकी येथील सोसायटीच्या चेअरमनपदी अंबादास बोरसे यांची बिनविरोध निवड झाल्याने आनंद व्यक्त करतांना संचालक व ग्रामस्थ. ०९ खामखेडा १

Web Title: Borse as Chairman of the Savki Society