न मागता उधारी झाली जमा
By Admin | Updated: November 9, 2016 23:27 IST2016-11-09T23:30:43+5:302016-11-09T23:27:09+5:30
न मागता उधारी झाली जमा

न मागता उधारी झाली जमा
मांडवड : केंद्र सरकारने ५०० व १००० च्या नोटा चलणातून बंद केल्याने ग्रामीण भागातील अनेक व्यापारी चिंतातूर दिसत होते कारण न मागता लोक मागील उधारी जमा करत होते तर काही लोक बळजबरी व्यापाऱ्याकडे पैसे जमा करत असल्याचे चित्र दिसून येत होते.
बाजारात अनेक लोक ५०० व १००० रुपयांचे सुटे मागताना दिसत होते. पेट्रोल पंपावर १०० रुपयाचे पेट्रोल न देता ग्राहकांना नाहक ५०० रुपयांचे पेट्रोल घ्यावे लागत होते. बाजारपेठेत जवळ जवळ सर्व व्यवहार बंद असल्याची स्थिती दिसून आली. अचानक झालेल्या निर्णयाने ग्रामीण भागातील नागरिक अवाक झाल्याचे दिसून आले. यात फक्त सामान्य नागरिकाची हेळसांड होताना दिसत होती. कारण त्याला कोणी ५०० चे सुटे मिळत नव्हते. (वार्ताहर)