स्टोव्हच्या भडक्याने भाजलेल्या महिलेचे निधन
By Admin | Updated: October 21, 2015 22:00 IST2015-10-21T21:59:31+5:302015-10-21T22:00:34+5:30
स्टोव्हच्या भडक्याने भाजलेल्या महिलेचे निधन

स्टोव्हच्या भडक्याने भाजलेल्या महिलेचे निधन
नाशिक : राहत्या घरी स्टोव्हचा भडका होऊन गंभीर भाजलेल्या महिलेचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि़२०) सायंकाळी मृत्यू झाला़ मयत महिलेचे नाव रुक्मिणी दगडू मदगे (२३) असे असून, त्या एकलहरे गेट परिसरात राहात होत्या़ स्टोव्हच्या भडक्याने नव्वद टक्के भाजल्याने त्यांना उपचारासाठी बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला़ याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)