नगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे बोरस्ते

By Admin | Updated: January 30, 2016 22:32 IST2016-01-30T22:18:26+5:302016-01-30T22:32:03+5:30

दिंडोरी : उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन देशमुख

Borge of the Congress President | नगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे बोरस्ते

नगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे बोरस्ते

दिंडोरी : नगरपंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्षपदी कॉँग्रेसचे भाऊसाहेब बोरस्ते, तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सचिन देशमुख यांची निवड झाली. नगरपंचायती निवडणूक होऊन त्यात कॉँग्रेस राष्ट्रवादी कॉँग्रेसने आघाडी घेत निवडणूक लढवली होती. त्यात कॉँग्रेसला सात, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला तीन जागा मिळाल्या होत्या.
कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीने जिल्हाधिकारी यांच्याकडे दहा नगरसेवकांच्या गटाची नोंदणी केली होती, तर शिवसेना दोन, मनसे, भाजपा प्रत्येकी एक, अपक्षांना तीन जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेच्या प्रमोद देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, भाजपा, मनसे व अपक्ष या सात नगरसेवकांच्या स्वतंत्र गटाची नोंदणी झाली होती. कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस आघाडीकडे बहुमत असल्याने त्यांचाच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष होणार हे निश्चित होते; परंतु शिवसेनेने ही निवडणूक प्रतिष्ठेची करत पदांच्या संभाव्य राजी-नाराजीचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करत निवडणुकीत प्रमोद देशमुख यांचा अर्ज दाखल करत निवडणूक लढवली, तर कॉँग्रेसने माजी सरपंच भाऊसाहेब बोरस्ते यांचा अर्ज दाखल केला होता.
यावेळी गटनेते माजी आमदार रामदास चारोस्कर, आघाडीचे नगरसेवक, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शिंदे, माधवराव साळुंखे, सुनील आव्हाड, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वासराव देशमुख, भास्कर भगरे, राजेंद्र उफाडे, डॉ. योगेश गोसावी, डॉ. अनिल सातपुते, श्याम हिरे, सुनील पाटील आदि उपस्थित होते. कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगराध्यक्ष -उपनगराध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: Borge of the Congress President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.