बोअरवेलचे काम बेतले जीवावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:17 IST2021-09-15T04:17:44+5:302021-09-15T04:17:44+5:30

लोहोणेर : - येथील प्रगतीशील शेतकरी प्रकाश सोनवणे यांच्या मालकीच्या विहिरीत आडवे बोअरिंगचे काम सुरू असताना अचानक मशीनचे वायर ...

Borewell work on Betle Jiva | बोअरवेलचे काम बेतले जीवावर

बोअरवेलचे काम बेतले जीवावर

लोहोणेर : - येथील प्रगतीशील शेतकरी प्रकाश सोनवणे यांच्या मालकीच्या विहिरीत आडवे बोअरिंगचे काम सुरू असताना अचानक मशीनचे वायर रोप तुटल्याने विहिरीत पडून सागर साठे (रा. बोकटे) याला डोक्याला मार लागल्याने मृत झाला. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हवालदार सोनवणे पुढील तपास करीत आहेत. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, लोहोणेर येथील सोनवणे यांच्या मालकीच्या शेतात (गट नंबर १७५ ) विहिरीत आडवे बोअररीग करण्याचे काम सुरू होते. अचानक मशीनचे वायररोप तुटल्याने सागर साठे ( वय २४) रा. बोकटे, ता.येवला हा मजूर विहिरीत पडल्याने डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता मृत घोषित केले. याबाबत देवळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास भोज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सोनवणे हे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Borewell work on Betle Jiva