थेरगावच्या सरपंचपदी बोराडे; उपसरपंचपदी गवारे

By Admin | Updated: July 22, 2014 00:57 IST2014-07-22T00:18:35+5:302014-07-22T00:57:24+5:30

थेरगावच्या सरपंचपदी बोराडे; उपसरपंचपदी गवारे

Boraday of Sarpanch of Thergaon; Gaureer | थेरगावच्या सरपंचपदी बोराडे; उपसरपंचपदी गवारे

थेरगावच्या सरपंचपदी बोराडे; उपसरपंचपदी गवारे

 कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या थेरगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध होऊन सरपंचपदी मंगला शरद बोराडे, तर उपसरपंचपदी वर्षा सीताराम गवारे यांची एकमताने निवड करण्यात आली.
ग्रामस्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या थेरगाव ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. मंगला शरद बोराडे, वर्षा सीताराम गवारे, सचिन तानाजी जाधव, किरण नारायण गवारे, अनिता मोतीराम कुवर, सविता गणपत जाधव यांची ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड झाली.
सरपंच व उपसरपंचपदाची निवडही शांततेर होऊन सरपंचपदी मंगला बोराडे, तर उपसरपंचपदी वर्षा गवारे यांची बिनविरोध निवड झाली. थेरगाव हे जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. यापुढेही गावात लोकोपयोगी योजना राबवून गावाचा नावलौकिक कायम राहील, असे काम करू असे यावेळी नवनिर्वाचित सरपंच मंगला शरद बोराडे यांनी सांगितले. याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Boraday of Sarpanch of Thergaon; Gaureer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.