सिन्नर : सिन्नर-सायखेडा रस्त्यावर देशवंडी शिवारात दुचाकीस्वारास मारहाण करून त्याची लूट केल्याची घटना घडली. पंकज शिवाजी शिंदे हे सिन्नरकडे येत असताना महादेव मंदिराजवळ त्यांची दुचाकी थांबविली. दुचाकीला कट मारल्याचे कारण सांगत त्यांना मारहाण करीत त्यांच्याकडील ११ हजार रुपये व मोबाइल गहाळ केल्याची तक्रार देण्यात आली आहे.सिन्नर बसस्थानकात एकाचा मृत्यूसिन्नर : येथील बसस्थानकात ३० वर्षीय युवकाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. कैलास साहेबराव गोरे (रा. माळेगाव) हा तरुण बसच्या प्रतीक्षेत होता. अचानक चक्कर येऊन त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलावून त्यास नगर परिषदेच्या रुग्णालयात नेले असताना डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
दुचाकीस्वाराची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:35 IST