तरूणावर हल्ला करून लूट
By Admin | Updated: October 2, 2014 00:35 IST2014-10-02T00:29:53+5:302014-10-02T00:35:31+5:30
तरूणावर हल्ला करून लूट

तरूणावर हल्ला करून लूट
मालेगाव : दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणावर हल्ला करून त्याच्या खिशातून साडेतीनशे रुपये हिसकावून चाकूने वार करून जखमी केल्याप्रकरणी कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील संतोष सोनवणे (३२) रा. कैलासनगर, मारुती मंदिराजवळ यांनी फिर्याद दिली. कैलासनगर भागातील कमलदीप गॅस एजन्सीच्या गुदामाजवळून सुनील सोनवणे जात असताना वाल्मीक बापू घोडेस्वार आणि सत्यम् गरुड या दोघांनी त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले.
पैसे दिले नाही म्हणून वाल्मीक घोडेस्वारने सोनवणेकडून साडेतीनशे रूपये बळजबरीने काढून घेतले. त्याने प्रतिकार केला असता वाल्मीकने चाकूसारखे धारदार शस्त्राने डाव्या हातावर वार करून जखमी केले.
(वार्ताहर)