मावळते संमेलनाध्यक्ष करणार पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:17 IST2021-02-16T04:17:23+5:302021-02-16T04:17:23+5:30

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना त्यांच्या घरी जाऊन पत्र देत ...

A book stall will be inaugurated by the declining conference president | मावळते संमेलनाध्यक्ष करणार पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन

मावळते संमेलनाध्यक्ष करणार पुस्तकांच्या स्टॉलचे उद्घाटन

नाशिक : साहित्य संमेलनाच्या आयोजक लोकहितवादी मंडळाच्या वतीने मावळते संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना त्यांच्या घरी जाऊन पत्र देत साहित्य संमेलनाचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले. यंदाच्या संमेलनात ते पदाची सूत्रे हस्तांतरित करण्यासह पुस्तक विक्रीच्या स्टॉल्सचे उदघाटन करण्याचेही त्यांनी मान्य केले.

साहित्य संमेलनाचे विद्यमान तथा मावळते संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटो यांच्या घरी जाऊन त्यांना नाशिकच्या संमेलनास येण्याचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी लोकहितवादी मंडळाचे शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील आणि संजय करंजकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना दिब्रिटो यांनी नाशिकच्या संमेलनाला यायला मिळणार असल्याचा आनंद व्यक्त केला. तसेच या संमेलनासाठी विज्ञानवादी लेखक डॉ. जयंत नारळीकर अध्यक्ष म्हणून लाभल्याबद्दलदेखील त्यांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: A book stall will be inaugurated by the declining conference president