पुस्तकविक्रेता महिलेची रोकड लंपास

By Admin | Updated: February 14, 2016 23:55 IST2016-02-14T23:39:13+5:302016-02-14T23:55:00+5:30

बाळ येशू यात्रोत्सव : चाळीस हजार लांबविले

Book seller woman's cash lapses | पुस्तकविक्रेता महिलेची रोकड लंपास

पुस्तकविक्रेता महिलेची रोकड लंपास

नाशिक : बाळ येशू यात्रेनिमित्त नेहरूनगरमधील सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके विक्री करणाऱ्या महिलेच्या पर्समधील ४० हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी (दि़१३) सायंकाळच्या सुमारास घडली़
बाळ येशू यात्रेनिमित्त सिस्टर मिशेल मथायस (३८, रा पौलाइन १४३,वॉटर फिल्ड रोड, बांद्रा वेस्ट, मुंबई) व त्यांच्या सहकाऱ्यांनी सेंट झेवियर्स स्कूलच्या प्रांगणात धार्मिक पुस्तके व सीडी विक्रीचे दुकान थाटले आहे़ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास दोन संशयित पुस्तक खरेदीच्या बहाण्याने आले़ त्यापैकी एकाने बायबल ग्रंथाविषयी विचारपूस केल्याने सिस्टर मिशेल त्यास ग्रंथ दाखवित होत्या़, तर त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या संशयिताने सिस्टर रुबा यांना तुमच्या पायाजवळ दहा रुपयांच्या नोटा पडल्याचे सांगितले़ त्या पैसे उचलण्याकरिता खाली वाकल्या असता या संशयिताने दिवसभर पुस्तकविक्रीतून जमा झालेली पर्समधील सुमारे ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेली़ मिशेल यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी दोन संशयितांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Book seller woman's cash lapses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.