इंदिरानगरमध्ये बॉम्बच्या अफवेने धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2015 23:07 IST2015-11-10T23:06:38+5:302015-11-10T23:07:22+5:30
इंदिरानगरमध्ये बॉम्बच्या अफवेने धावपळ

इंदिरानगरमध्ये बॉम्बच्या अफवेने धावपळ
इंदिरानगर : इंदिरानगर परिसरातील श्रीजयनगर रस्त्यावर पडलेल्या बेवारस टिफीनमुळे मंगळवारी धावपळ उडाली़ बॉम्बशोधक व नाशक पथकाने तत्परतेने घटनास्थळी पोहोचून शोध घेतला असता यामध्ये बॉम्ब नसल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला़
मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास श्रीजयनगर रस्त्यावरील दुभाजकाजवळ एक बेवारस डबा पडलेला होता़ या डब्याबाबत नागरिकांना शंका आल्याने त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दूरध्वनीद्वारे ही माहिती दिली़ यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बॉम्बशोधक व नाशक पथकाला पाचारण केले़ (वार्ताहर)