शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

बॉम्बस्फोट तपासी अधिकारी ते सीबीआय संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 01:23 IST

राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा.  या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुन्ह्यांचा जयसवाल यांनी कसोशीने तपास करत अनेक मासे गळाला लावले होते. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने भल्याभल्यांना धडकी भरविली होती. त्यांच्याकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.

ठळक मुद्देतेलगी घोटाळ्याचाही केला तपास : सुबोधकुमार जयस्वाल यांचा नाशिकशी जवळचा संबंध 

नाशिक : राज्याचे पोलीस महासंचालक असलेले १९८५ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी सुबोध कुमार जयस्वाल यांचा पोलीस सेवेत नाशिक सोबत जवळचा संबंध आला. तेलगी मुद्रांक घोटाळ्याचा तपास असो किंवा मालेगाव बॉम्बस्फोटाचा.  या दोन्ही महत्वाच्या व राज्याचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या गुन्ह्यांचा जयसवाल यांनी कसोशीने तपास करत अनेक मासे गळाला लावले होते. त्यांच्या धडाकेबाज कारवाईने भल्याभल्यांना धडकी भरविली होती. त्यांच्याकडे केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) संचालकपदाची सूत्रे सोपविण्यात आली आहेत.राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख असताना जयस्वाल यांनी नाशिकच्या मालेगाव मधील बॉम्बस्फोटाचा तपास केला होता.तसेच  मुंबईतील २००६ रेल्वे बॉम्बस्फोटाचा तपास त्यांच्याच नेतृत्वात सुरू करण्यात आला होता.  त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील नाशिक सारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये पोलीस सेवा बजावल्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे.  २००८ साली केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेलेल्या सुबोध कुमार यांना २०१८ साली पुन्हा एकदा महाराष्ट्रात बोलवण्यात आले. तेव्हा ते भारतीय गुप्तचर संस्थेच्या ( रॉ) अतिरिक्त सचिव पदावर कार्यरत होते. दोन वर्षांपूर्वी त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. २०१९ साली त्यांना पदोन्नती देऊन महाराष्ट्र पोलीस दलाचे महासंचालक पद सोपविण्यात आले होते. त्यानंतर आता थेट सीबीआय संचालकपदाची धुरा त्यांना देण्यात आली आहे.  सीबीआयच्या संचालकपदाची सूत्रे हाती घेणारे जयस्वाल हे महाराष्ट्र कॅडरचे दुसरे अधिकारी ठरले आहेत.धडाकेबाज कामगिरीने चर्चेतबहुचर्चित कोट्यावधी रुपयांचा तेलगी स्टँप पेपर घोटाळ्याच्या तपासी पथकाचे ही ते प्रमुख राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी केलेल्या धडाकेबाज कारवाईने जयस्वाल चर्चेत राहिले होते. यावेळी त्यांनी पोलीस दलातील अनेक बड्या अधिकारीही आपल्या चौकशीच्या ‘रडार’वर घेतले होते. तसेच अनेक पोलिसांना अटकही केली होती. 

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसMalegaon Blastमालेगाव बॉम्बस्फोट