बोकटे ग्रामपंचायतीत कालभैरवनाथ जनविकास सत्ता कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 01:25 IST2021-01-19T19:40:15+5:302021-01-20T01:25:53+5:30
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बोकटे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले आणि प्रताप दाभाडे यांच्या श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलने सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारत नऊपैकी आठ जागांवर विजय संपादन केला,.

येवला तालुक्यातील बोकटे ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलचा जल्लोष करताना कार्यकर्ते.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील बोकटे येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य महेंद्रकुमार काले आणि प्रताप दाभाडे यांच्या श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलने सलग चौथ्यांदा विजयी चौकार मारत नऊपैकी आठ जागांवर विजय संपादन केला, तर सीताराम दाभाडे यांच्या लोकशाही जनविकास पॅनलला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले.
विजयी उमेदवारांत वॉर्ड क्र. एकमधून अरुण दिनकर मोरे , भारती सर्जेराव बागल, साधना महेंद्रकुमार काले, वॉर्ड क्र. दोनमधून सुनीता अनिल मोरे, विलास संजय दाभाडे, वॉर्ड क्र. तीनमधून संतोष मोतीराम निकम, प्रताप शिवाजीराव दाभाडे, वैशाली विजय दाभाडे, हे श्री कालभैरवनाथ जनविकास पॅनलचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत. तर लोकशाही जनविकास पॅनलचे वॉर्ड क्रमांक दोनमधून सर्वसाधारण स्री राखीव जागेवर अंजली पोपट दाभाडे या एकमेव उमेदवार निवडून आल्या.
विजयी उमेदवारांमध्ये प्रताप शिवाजी दाभाडे आणि साधना महेंद्रकुमार काले हे सलग चार वेळेस निवडून येऊन त्यांनी विजयाचा चौकार मारला,यात प्रताप दाभाडे हे सर्वाधिक मताधिक्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून येऊन एक जनतेसमोर नवा इतिहास रचला. महेंद्रकुमार काले हे जिल्हा सदस्य आणि प्रताप दाभाडे हे अखिल भारतीय सरपंच परिषद येवला तालुका अध्यक्ष असल्याने तालुक्याचे लक्ष बोकटे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीकडे लागले होते.