बोकटेचा कालभैरवनाथ यात्रोत्सव रद्दचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 00:00 IST2020-04-14T23:36:18+5:302020-04-15T00:00:40+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोकटे येथील श्री कालभैरवनाथ यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून, या यात्रोत्सवासाठी भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बोकटे, ता. येवला येथे मंदिरासमोर ठेवण्यात आलेला पोलीस बंदोबस्त.
अंदरसूल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बोकटे येथील श्री कालभैरवनाथ यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून, या यात्रोत्सवासाठी भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ग्रामीण भागातील मोठ्या आर्थिक उलाढालीची यात्रा म्हणून बोकटे येथील श्री कालभैरवनाथ यात्रेची ओळख आहे. विशेष म्हणजे नाशिक-नगर जिल्ह्यातून व्यापारी व भाविकांची यात्रोत्सवानिमित्ताने गर्दी असते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीस येथे श्री कालभैरवनाथ मंदिरात आणल्यास अथवा येथील भस्म लावल्यास ती व्यक्ती दगावत नसल्याची भाविकांची भावना असून, कालभैरवनाथ नवसाला पावणारा असल्याचीही श्रद्धा आहे. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रोत्सवात दररोज लाखो रु पयांची उलाढाल होत असते. मात्र, कोरोनामुळे यात्रोत्सव रद्द झाल्याने व्यापारीवर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.