उपनगरला दुचाकीस्वारांचा उपद्रव
By Admin | Updated: October 30, 2015 22:59 IST2015-10-30T22:59:08+5:302015-10-30T22:59:57+5:30
उपनगरला दुचाकीस्वारांचा उपद्रव

उपनगरला दुचाकीस्वारांचा उपद्रव
उपनगर : लोखंडेमळा परिसर आणि जेलरोड रस्त्यावर सुसाटवेगाने दुचाकी हाकणाऱ्या टवाळखोरांचा त्रास नागरिकांना आणि विशेषत: महिलावर्गाला सहन करावा लागत आहे. उपनगर परिसरातील कॉलनी, नगर परिसरातील अरुंद रस्त्यांवर टवाळखोर सुसाट वेगाने दुचाकी चालवित असल्याने अपघात घडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अंतर्गत रस्त्यांवर असलेल्या इमारतींच्या पार्किंग परिसरात कित्येकदा लहान मुले खेळत असतात. मुले कॉलनी रस्त्यावर येऊ शकतात. अशावेळी भरधाव वेगाने धावणाऱ्या दुचाकींमुळे अपघात होण्याची शक्यता असते. शिवाय इमातींमधून चारचाकी, दुचाकी वाहने घेऊन रस्त्यावर येणाऱ्यांनाही या भरधाव दुचाकीस्वारांचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा दुचाकीस्वारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)