‘बोगस गारपीट’ शेतकर्यास ‘मारपीट’!
By Admin | Updated: June 3, 2014 00:53 IST2014-06-03T00:09:21+5:302014-06-03T00:53:51+5:30
बोगस गारपिटीची तक्रार करणार्या शेतकर्याने आपणास मारपीट झाल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दाखल केली

‘बोगस गारपीट’ शेतकर्यास ‘मारपीट’!
गिरीश जोशी ल्ल मनमाड मोहेगाव, ता. नांदगाव येथे कु ठल्याही प्रकारची गारपीट व अतिवृष्टी झाली नसून सरपंच व सदस्यांनी पदाचा गैरवापर करून मंजूर करून घेतलेली बोगस मदत थांबविण्याच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकार्यांसमोरच शेतकर्यांनी गोंधळ घातल्याने अधिकार्यांना काढता पाय घ्यावा लागला, तर बोगस गारपिटीची तक्रार करणार्या शेतकर्याने आपणास मारपीट झाल्याची तक्रार मनमाड पोलीस ठाण्यात दाखल केली असून, याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्याच्या काही भागांत अतिवृष्टी होऊन गारपीट झाली व शेती पिकांचे नुकसान झाले. यानंतर शासकीय यंत्रणेने नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या शेतातील शेतमालाच्या नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव सादर केले. यावरून अनेक ठिकाणी नुकसानग्रस्त शेतकर्यांसाठी शासकीय मदत जाहीर झाली. मोहेगाव येथेही या मदतीचे वाटप शेतकर्यांना सुरू करण्यात आले असून, अनेक शेतकर्यांना ही मदत मिळाली आहे. असे असले तरी येथील काही शेतकर्यांनी या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची गारपीट व अतिवृष्टी झाली नसल्याने मदत वाटप थांबवावी अशी मागणी तहसीलदारांकडे केली. सरपंच व ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य यांनी पदाचा गैरवापर करून अधिकार्यांना हाताशी धरून पंचनामे केले गेले असल्याचे तक्रारदारांचे म्हणने असून, शासनाची फसवणूक करून उपलब्ध झालेली मदत थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. बोगस पंचनामे केले असल्याचे या शेतकर्यांचे म्हणने आहे. संबंधीतांनी नातेवाईक व जवळच्या लोकाच्या नावाने मदत मिळवून घेतली आहे. असेही या तक्रार अर्जात म्हटले असून अर्जावर नामदेव कारभारी शिंदे, शेखर पाराशरे, वाल्मीक शिंदे, कैलास शिंदे, बाळू हारदे यांच्यासह १०७ शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहे. चौकशी अधिकार्यांसमोर गोंधळ तहसील कार्यालयाला दिलेल्या या तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी शासनाच्या वतीने हिसवळचे मंडल अधिकारी के. एम. बागुल, भालूर सजेचे तलाठी व्ही. बी. बोडके, कृषी सहायक सोनाली देसाई या अधिकार्यांचे पथक मोहेगाव येथे दाखल झाले. तक्र्रारदार व्यक्तींचे म्हणने समजून घेऊन त्यांची बाजू ऐकून चौकशी करण्यासाठी आलेल्या पथकासमोरच काही ग्रामस्थांनी गोंधळ घातला. आरडाओरडा व हमरीतुमरीच्या वातावरणात चौकशी सुरू असल्याने खूपच गोंधळाचे वातावरण तयार झाले. अखेर चौकशीसाठी आलेल्या या अधिकार्यांनी मोहेगाव येथून काढता पाय घेतला.