कन्नमवार पुलाखाली तरुणाचा मृतदेह
By Admin | Updated: November 14, 2015 22:01 IST2015-11-14T22:01:28+5:302015-11-14T22:01:44+5:30
कन्नमवार पुलाखाली तरुणाचा मृतदेह

कन्नमवार पुलाखाली तरुणाचा मृतदेह
पंचवटी : कन्नमवार पुलाखाली नदीपात्रात बुधवारी (दि़११) दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली़ मयत युवकाचे वय अंदाजे अठरा ते वीस वर्ष असून, नागरिकांनी या घटनेची माहिती आडगाव पोलिसांना दिल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले़
या युवकाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला आहे़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दरम्यान या युवकाबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी आडगाव पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे़ (वार्ताहर)
’नाशिक : खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील चेन चोरट्यांनी चोरून नेली़ (दि़६) दुपारच्या सुमारास खरेदीसाठी मेनरोडला गेल्या होत्या़