राहुड शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह

By Admin | Updated: July 17, 2014 00:54 IST2014-07-14T21:52:36+5:302014-07-17T00:54:12+5:30

राहुड शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह

The body of an unknown god in Rahud Shivar | राहुड शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह

राहुड शिवारात अज्ञात इसमाचा मृतदेह

चांदवड : तालुक्यातील राहुड शिवारात राहुड धरणासमोरील दुभाजकांच्या झाडामध्ये एक ३६ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला. त्याची ओळख पटली नाही. याबाबत राहुड येथील धर्मा सोमवंशी यांनी चांदवड पोलीस स्टेशनला खबर दिली त्यानुसार चांदवडचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले व त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणला. त्यांचे वय अदांजे ३६ वर्षे असून, उंची पाच फुट, रंगाने सावळा, विटकरी रंगाचा शर्ट व काळी पॅन्ट व तो भिक मागत असावा असा अंदाज पोलिसांचा असून, त्याची ओळख पटली नाही या इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास चांदवड पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले आहे. चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास जमादार एस. आर. जाधव, डगळे हे करीत आहेत.
(वार्ताहर)

Web Title: The body of an unknown god in Rahud Shivar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.