शिंदेगावात हॉटेलमध्ये आढळला नोकराचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:27 IST2021-02-18T04:27:38+5:302021-02-18T04:27:38+5:30
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नायगाव रोडवरील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवीण मनोहर चरडे (४०, रा. पाढुंर्ली) हा लॉकडाऊनपूर्वी नोकर ...

शिंदेगावात हॉटेलमध्ये आढळला नोकराचा मृतदेह
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, नायगाव रोडवरील एका हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर प्रवीण मनोहर चरडे (४०, रा. पाढुंर्ली) हा लॉकडाऊनपूर्वी नोकर म्हणून कामाला होता. काही दिवसांपूर्वीच पुन्हा तो हॉटेलमध्ये कामासाठी आला होता. गेल्या ७ फेब्रुवारी रोजी प्रवीणने हॉटेल मालकाला फोन करून माझी तब्येत चांगली नसल्याचे सांगितले. तेव्हा हॉटेल मालकाने प्रवीणला घरी जाण्यास सांगितले होते. त्यानंतर नोकर प्रवीण हॉटेलमध्ये तिसऱ्या मजल्यावर नोकरांच्या खोलीमध्ये कधी राहण्यास गेला हे कोणालाच समजले नाही. बुधवारी दुपारच्या सुमारास हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून अचानक मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येऊ लागल्याचे कामगारांच्या लक्षात आले. कामगारांनी मालकाला याबाबत सांगितले. त्यानंतर मालकासह कामगारांनी तिसऱ्या मजल्यावर नोकरांसाठी असलेल्या खोलीत धाव घेतली. तेथे नोकर प्रवीण मृतावस्थेत आढळून आला. याबाबत तातडीने नाशिकरोड पोलिसांना हॉटेल मालकाकडून माहिती देण्यात आली. तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.