शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आठ वर्षीय बेपत्ता मुलीचा आढळला मृतदेह, मालेगावातील घटना; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 16:27 IST

मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संशयिताचा शोध घेण्याची मागणी करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.

चंद्रकांत सोनार  

मालेगाव : आजीच्या घरातून मध्यरात्रीच्या सुमारास बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय बालिकेचा मृतदेह परिसरातील विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. मुलीचा घातपात झाला असल्याचा संशय व्यक्त करीत संशयिताचा शोध घेण्याची मागणी करीत नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. दरम्यान, बालिकाचा मृतदेह धुळे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाळेला सुट्या असल्याने आठ वर्षीय बालिका आपल्या आजीकडे राहायला आली होती. मंगळवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास आजी परिसरात पुरणाच्या पोळ्या लाटण्यासाठी गेली होती. काही वेळानंतर त्या घरी आल्या असता घरात चिमुकली आढळून आली नाही. बालिका बेपत्ता झाल्याने नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनीही तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही.

बुधवारी सकाळच्या सुमारास बालिकेचा मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेने सारेच हादरले. कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. मुलीचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करीत नातेवाईक आणि नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करीत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. संशयिताला ताब्यात घेऊन कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांनी मागणी केली. सुमारे तासभराच्या आंदोलनानंतर पोलिसांना नागरिकांना समजावण्यात यश आले.

दरम्यान, मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला होता. त्यानंतर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. नागरिकांच्या भावना तीव्र असल्याने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी