लखमापूरच्या युवकाचा मृतदेह सुरत येथे आढळला
By Admin | Updated: June 2, 2014 00:37 IST2014-06-01T21:34:58+5:302014-06-02T00:37:30+5:30
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील युवकाचा मृतदेह गुजरात राज्यातील सुरत येथे आढळला असून गेल्या आठवडाभरापासून तो बेपत्ता होता. लखमापूर ग्रामपालिकेच्या माजी सरपंचाचा तो मुलगा होता.

लखमापूरच्या युवकाचा मृतदेह सुरत येथे आढळला
वणी : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील युवकाचा मृतदेह गुजरात राज्यातील सुरत येथे आढळला असून गेल्या आठवडाभरापासून तो बेपत्ता होता. लखमापूर ग्रामपालिकेच्या माजी सरपंचाचा तो मुलगा होता.
लखमापूर ग्रामपालिकेचे माजी सरपंच नाना उमाजी सोनवणे यांचा मुलगा मनोज सोनवणे याचा भाजीपाला वाहतुकीचा व्यवसाय होता. परिसरातून तो गुजरात राज्यात स्वमालकीच्या आयशर टेंपोमधून भाजीपाला वाहतुक करीत असे. २५ मे रोजी तो लखमापूर गावातून शेतकर्यांचा भाजीपाला घेऊन गुजरात राज्यातील सुरत येथील सरदार मार्केटमध्ये गेला होता. मात्र नेहमीप्रमाणे तो परतला नाही व त्याचा भ्रमणध्वनीही संपर्कात नसल्याने मनोजच्या कुटंुबियांनी सुरत येथे धाव घेऊन पुन्हा पोलीस ठाण्यात मनोज हरविल्याची तक्रार नोंदविली. सरदार मार्केटलगत असणार्या फ्रुट मार्केटपासून दोनशे फूट अंतरावर असलेल्या खाडीत एक मृतदेह असल्याची माहिती सुरत पोलिसांना मिळाल्याने चौकशीत तो मनोज असल्याचे निष्पन्न झाले. कुटंुबियांच्या तक्रारीवरून घटनाक्रम बघता मनोजचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त केल्याने याबाबत गुन्हा दाखल आल्याची माहिती मिळाली आहे. (वार्ताहर)