जळालेल्या अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह
By Admin | Updated: December 30, 2015 23:14 IST2015-12-30T23:12:53+5:302015-12-30T23:14:30+5:30
जळालेल्या अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह

जळालेल्या अवस्थेत आढळला मुलीचा मृतदेह
लासलगाव : निफाड तालुक्यातील देवगाव येथे महादेवनगर येथील अल्पवयीन महाविद्यालयीन युवतीचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत तिच्या घराजवळच आढळून आला आहे. याप्रकरणी घातपाताची शक्यता वर्तवली जात असून, पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
देवगाव येथील संजय चोपडे यांची मोठी मुलगी मनीषा संजय चोपडे (१६) हीचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानालगत अर्धवट जळालेल्या अवस्थेत बुधवारी (दि. ३०) सकाळी आढळून आला. मृतदेह निदर्शनास आल्यानंतर परिसरातील एका तरु णीने आरडओरड करून पालकांना या घटनेची माहिती दिली. चोपडे कुटुंबीयांतील कोणताही सदस्य घरी नसल्याने ही दुर्दैवी घटना घडली असल्याने घातपाताचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान, लासलगाव पोलिसांना घटनेची माहीती मिळताच त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे पाठविला आहे. मनीषाचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला ती जागा एकांतात आहे. तिच्या मृत्यूबाबतचे निश्चित कारण उत्तरीय तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.
, या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (वार्ताहर)