गुदामात आढळला मृतदेह
By Admin | Updated: September 12, 2016 01:55 IST2016-09-12T01:55:24+5:302016-09-12T01:55:43+5:30
गुदामात आढळला मृतदेह

गुदामात आढळला मृतदेह
नाशिक : दिंडोरीरोड परिसरातील एका केळीच्या गुदामात काम करणाऱ्या कामगाराचा मृतदेह रविवारी (दि़११) सकाळच्या सुमारास आढळून आल्याने खळबळ उडाली होती़ या कामगाराचे नाव कपिल कचरू चौधरी (५०) असे असून तो घोटीतील इंदिरानगर परिसरातील रहिवासी आहे़
चौधरी हे केळीच्या गुदामात कामास तसेच झोपत होते़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)