शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदनगरमधील बेपत्ता विवाहितेचा मृतदेह आढळला राहत्या इमारतीच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 15:59 IST

मयत महिलेच्या नातेवाईकांकडे त्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली; मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये घातपाताबाबतची कु ठलाही पुरावा आढळून आला नाही.

ठळक मुद्दे अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आलेसिडको उपकेंद्राचा बंब घटनास्थळी तत्काळ पोहचलामहिलेने आत्महत्त्या केली असावी असा अंदाज पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी वर्तविला

नाशिक : मागील दोन दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झालेल्या ४३ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह राहत्या इमारतीच्या टेरेसवर असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली. प्रारंभी पोलिसांना काही घातपाताचा संशय होता; मात्र शवविच्छेदन अहवालातून तसे काही पुरावे पुढे आले नसल्याची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुनील नंदवाळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, गोविंदनगर परिसरातील कृषी बॅँक सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहणा-या उषा नाना पाटील या दोन दिवसांपासून राहत्या घरातून बेपत्ता झाल्या होत्या. त्याबाबतची माहिती नातेवाईकांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली होती. दरम्यान, रविवारी सकाळी दहा वाजता पाटील यांचा मृतदेह सोसायटीच्या वरील पाण्याच्या टाकीमध्ये तरंगताना पोलिसांना आढळून आला. याबाबत तत्काळ पोलिसांनी अग्निशामक दलाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. सिडको उपकेंद्राचा बंब घटनास्थळी तत्काळ पोहचला. यावळी फायरमन बाळू लहामगे, संजय गाडेकर, सुनील निळे, शिवाजी मतवाड आदिंनी घटनास्थळी पोहचून पाण्याच्या टाकीत तरंगणारे मृतदेह तीन तास अथक प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढला.याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला. प्रथमदर्शनी घातपाताचा संशय पोलिसांना बळावला होता. त्यामुळे मयत महिलेच्या नातेवाईकांकडे त्याबाबत पोलिसांनी विचारपूस केली; मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालामध्ये घातपाताबाबतची कु ठलाही पुरावा आढळून आला नाही. त्यामुळे  सदर महिलेने आत्महत्त्या केली असावी असा अंदाज पोलीस निरिक्षक नंदवाळकर यांनी वर्तविला आहे. याप्रकरणी मंबई नाका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महिलेच्या पश्चात पती, मुले असा परिवार असल्याचे समजते.

टॅग्स :Deathमृत्यूWomenमहिलाnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय