विंचूर : येथील दोन अल्पवयीन मुली गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे मृतदेह आज पालखेड डाव्या कालव्यात आढळून आले.येथील खाडे गल्लीतील अर्पिता सुनील गायकवाड (१५) व कोमल संतोष गायकवाड (१४) या चुलत बहिणी शुक्रवारी (दि.२) दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान घरातून बाहेर गेल्या. त्या पुन्हा घरी परतल्याच नाही. त्यामुळे आई वडील व नातलगांनी बरीच शोधाशोध केली. व अखेर शनिवारी (दि.३) कोमल हिचे वडील संतोष गायकवाड यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती.दरम्यान रविवारी (दि.४) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कोमल हिचा मृतदेह शिरसगाव शिवार (ता. येवला) येथे पालखेड डाव्या कालव्यामध्ये विद्युत पंपाच्या पाईपला अडकलेल्या स्थितीत आढळून आला. तर अर्पिता हिचा मृतदेह दुपारी दोन वाजेच्या सुमारास वेळापूर (ता. निफाड) शिवारात पालखेड डाव्या कालव्यात आढळून आला.याबाबत माहिती मिळताच लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ हे आपल्या सहकाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. व बेपत्ता मुलींच्या पालकांना बोलावून मृतदेहाची पहाणी केली असता त्या बेपत्ता मुलींच असल्याची खातरजमा केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय निफाड व येवला येथे पाठविण्यात आले.सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शोकाकुल वातावरणात या मुलींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलींंच्या बेपत्ता प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मृतदेह सापडल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक उदय मोहरे, हवालदार राजेश घुगे, योगेश शिंदे, कैलास मानकर हे करीत आहेत.
बेपत्ता मुलींचे आढळले पालखेड कालव्यात मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:44 IST
विंचूर : येथील दोन अल्पवयीन मुली गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यांचे मृतदेह आज पालखेड डाव्या कालव्यात आढळून आले.
बेपत्ता मुलींचे आढळले पालखेड कालव्यात मृतदेह
ठळक मुद्देविंचूर : चुलत बहिणीचे केले होते अज्ञात युवकाने अपहरण