विवाहितेचा मुलीसह विहिरीत मृतदेह

By Admin | Updated: February 15, 2016 23:43 IST2016-02-15T23:18:21+5:302016-02-15T23:43:25+5:30

जायखेडा : सासरच्या दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

The bodies of the bride and groom in the well | विवाहितेचा मुलीसह विहिरीत मृतदेह

विवाहितेचा मुलीसह विहिरीत मृतदेह

जायखेडा : बागलाण तालुक्यातील करंजाड येथील बोरसे वस्ती येथे राहणारी विवाहिता उज्ज्वला भूषण बोरसे (२३) हिचा मृतदेह आपल्या नऊ महिन्यांच्या मुलीसह विहिरीत आढळून आल्याने मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
मुळाणे येथील माहेर असलेल्या उज्ज्वलाचा विवाह करंजाड येथील भूषण बोरसे यांच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला. त्यांना नऊ महिन्याची नियती नावाची गोंडस मुलगी होती. मात्र दुर्दैवाने सकाळी उज्ज्वला व तिची मुलगी नियती हिचा मृतदेह जवळच्या विहिरीत आढळून आला. स्थानिकांच्या मदतीने दोघी मायलेकींचा मृतदेह सकाळी विहिरीतून काढण्यात आला. त्यानंतर नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी प्रारंभी जायखेडा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली
होती.
त्यानंतर राकेश बारकू ह्याळीज, रा. मुळाणे यांच्या फिर्यादीवरून भूषण सुपडू बोरसे, सासरे सुपडू विठ्ठल बोरसे, सासू द्रौपदाबाई सुपडू बोरसे, जेट भटू सुपडू बोरसे, जेठाणी रोहिणी भटू बोरसे, भाचा दर्शन बागुल खमताणे, नणंद प्रगती
केवळ बागुल, राणी अशोक पवार, केवळ साहेबराव बागुल, अशोक पुंडलीक पवार, जोरण यांच्यावर जायखेडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस
निरीक्षक राजेंद्र होळकर, आर .एस. सोनजे, हवालदार भावराव काळे, हवालदार सुरेश मोरे करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: The bodies of the bride and groom in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.