गंगाघाटावर बोटींपाठोपाठ टपऱ्या जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:14 IST2021-03-27T04:14:41+5:302021-03-27T04:14:41+5:30

चायनीज हातगाड्यांची जाळपोळ केल्याप्रकरणी बोरगड एकता नगर येथे राहणाऱ्या अनिता राऊत या महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली ...

Boats were set ablaze on the Ganges | गंगाघाटावर बोटींपाठोपाठ टपऱ्या जाळल्या

गंगाघाटावर बोटींपाठोपाठ टपऱ्या जाळल्या

चायनीज हातगाड्यांची जाळपोळ केल्याप्रकरणी बोरगड एकता नगर येथे राहणाऱ्या अनिता राऊत या महिलेने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंगाघाटावरील गाडगे महाराज पुलालगत असलेल्या खंडेराव महाराज मंदिरासमोर दैनंदिन खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या उभ्या केल्या जातात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमाराला अज्ञात समाजकंटकांनी मंदिरासमोर उभ्या केलेल्या राऊत, सागर कुवर, रमेश शिवपाली यांच्या हातगाड्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून त्या पेटवून दिल्या. सदर हातगाड्यामध्ये गॅस सिलिंडरदेखील ठेवण्यात आले होते. सुदैवाने गॅस सिलिंडरने पेट घेतला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे स्थानिक विक्रेत्यांनी सांगितले.

घटनेचे वृत्त कळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली गांधी तलावात बोटींची जाळपोळ करणारे व चायनीज हातगाड्या जाळणारे संशयित पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

Web Title: Boats were set ablaze on the Ganges