दहावी-बारावी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:14 IST2021-03-31T04:14:37+5:302021-03-31T04:14:37+5:30

नाशिक विभागीय मंडळाचे कार्यकक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांच्या मदतीसाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांची नियुक्ती ...

Board help for 10th-12th disabled students | दहावी-बारावी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची मदत

दहावी-बारावी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची मदत

नाशिक विभागीय मंडळाचे कार्यकक्षेतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांच्या मदतीसाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्य व उच्च माध्य.शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळाचे विभागीय सचिव राजेंद्र अहिरे यांनी याबाबतची माहिती दिली.

नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत येणाऱ्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, दिव्यांग विद्यार्थी, पालक यांनी काही अडचणी आल्यास किंवा संबंधित परीक्षेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी सहायक सचिव मंदाकिनी देवकर यांच्याशी ७७५५९०३४२७,८८८८३३९४२३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. असे विभागीय सचिव अहिरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Web Title: Board help for 10th-12th disabled students